मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मशिदीच्या बाहेर रस्त्यावर २५ मुसलमानांकडून नमाजपठण !
गुन्हा नोंद, इमामाला अटक !
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील रहमान मशिदीच्या बाहेर रस्त्यावर २५ मुसलमान नमाजपठण करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला. मशिदीचे इमाम (इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) मौलाना (इस्लामी अभ्यासक) नसीम यांना अटक केली. पोलीस उपायुक्त आयुश विक्रम सिंह यांनी सांगितले की, भा.दं.वि. च्या कलम ३४१ च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून अन्य मुसलमानांची ओळख पटवण्याचा प्रयत्न व्हिडिओतून केला जात आहे.
सड़क पर नमाज का वीडियो वायरल, मस्जिद के इमाम सहित 25 लोगो के खिलाफ मुकदमा दर्ज
UP : मुजफ्फरनगर के शहर कोतवाली इलाके के रहमतनगर फव्वारा चौक स्थित रहमान मस्जिद के बाहर सड़क पर जुमे की नमाज पढ़ते नमाजियों का वीडियो वायरल होने के बाद पुलिस ने मुकदमा दर्ज कर लिया है। पुलिस ने अपनी… pic.twitter.com/TDlQqvjwZN— TRUE STORY (@TrueStoryUP) July 15, 2023
गेल्या वर्षी रस्त्यावरील नमाजपठणाला विरोध करण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड यांचे पाठण करण्यास आरंभ केला होता. यावरून उत्तरप्रदेशसह देशातील काही राज्यांमध्ये रस्त्यावरील नमाजपठणावर बंदी घालण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाधर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना वेठीस धरणारे पुरो(अधो)गामी रस्त्यावरील नमाजपठणाच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत, हे जाणा ! |