भूकेकंगाल पाक राजधानी इस्लामाबादचे आंतरराष्ट्रीय विमानतळ विदेशी आस्थापनास चालवायला देणार !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भूकेकंगाल झालेल्या आणि कर्जाखाली दबलेल्या जिहादी पाकिस्तानवर त्याच्या राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ विदेशी आस्थापनाला चालवायला देण्याची पाळी आली आहे. यासाठी त्याने एका समितीची स्थापनाही केली आहे. या दृष्टीने पाकिस्तान त्याच्या नागरी उड्डयनसंबंधी कायद्यामध्ये जुलै मासाच्या अंतापर्यंत पालट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती पाकचे केंद्रीय अर्थमंत्री इशाक डार यांनी दिली. ही संपूर्ण प्रक्रिया १२ ऑगस्टच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. १२ ऑगस्टला वर्तमान सरकार विसर्जित होत असून त्यानंतर निवडणुका होणार आहेत, अशी माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली.