पाक आतंकवाद्यांना साहाय्य करणारे काश्मीर प्रशासनातील ३ अधिकारी बडतर्फ !
पोलीसदलातील एकाचा समावेश
श्रीनगर – काश्मीर विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी (पी.आर्.ओ.) फहीम अस्लम, पोलीसदलातील हवालदार अर्शीद अहमद आणि महसूल विभागात कार्यरत हुसेन मीर यांना पाक आतंकवाद्यांना साहाय्य केल्याच्या आरोपाखाली उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी नोकरीवरून काढून टाकले. आतंकवादी विचारसरणीचा प्रचार आणि आतंकवाद्यांसाठी पैसा गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे तिन्ही आरोपी पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय., तसेच इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेसाठी काम करत होते.
The Jammu and Kashmir government invoked Article 311 (2) (c) of the Constitution to terminate the employment of three government workers for being a “threat to the security of the state” #JammuAndKashmir https://t.co/VvbWSZlquR
— Financial Express (@FinancialXpress) July 17, 2023
१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बडतर्फ करण्यात आलेल्या तिघांवर बर्याच दिवसांपासून नजर ठेवण्यात आली होती.
२. काश्मीर विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी फहीम अस्लम याने २३ मे २०२० या दिवशी सामाजिक माध्यमांवर एक ‘पोस्ट’ प्रसारित करून त्यामध्ये, ‘एक सत्य जे कधीही पालटू शकत नाही. काश्मीर नेहमीच पाकिस्तानसोबत ईद साजरी करेल. आम्ही पाकिस्तानसोबत राहू’, असे लिहिले होते. दुसर्या एका पोस्टमध्ये फहीम याने काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांचे कौतुक केले होते.
संपादकीय भूमिका
|