पाकिस्तानात हिंदु मंदिरावर दरोडेखोरांनी डागले रॉकेट !
|
कराची (पाकिस्तान) – पाकमध्ये मागील ४८ घंट्यांत हिंदूंच्या २ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. एक मंदिर पाडण्यात आले, तर दुसर्यावर गोळीबार आणि रॉकेट डागण्यात आले. पाकमधील विवाहित आणि ४ मुलांची माता असणारी सीमा हैदर ही महिला भारतातील तिच्या हिंदु प्रियकरासाठी भारतात आली आहे. तिने भारतात जाऊन येऊन हिंदु धर्मही स्वीकारला आहे. यावरून पाकमधील एका दरोडेखोरांच्या टोळीने धमकी दिली होती, ‘भारताने सीमा हिला पुन्हा पाकिस्तानमध्ये पाठवावे, अन्यथा पाकमधील हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर आक्रमणे करण्यात येतील.’ त्यामुळे मंदिरांवर आक्रमण होत असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनीही या आक्रमणामागे दरोडेखोरांची टोळी असल्याचे म्हटले आहे.
Hindu Temple Attack in Pakistan: Gang of Decoits Demolished Temple With Rocket Launchers in Sindh Province; Second Such Incident in Less than Two Days #HinduTemple #Pakistan #SindhProvince https://t.co/zVpf4Iqupn
— LatestLY (@latestly) July 16, 2023
१. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील काशमोर भागात १७ जुलैच्या सकाळी हिंदूंच्या एका मंदिरावर रॉकेटने आक्रमण करण्यात आले. तसेच या मंदिराच्या परिसरात गोळीबारही करण्यात आला. गोळीबार करणारे नंतर पळून गेले.
२. गोळीबाराच्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, या वेळी मंदिर बंद होते, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. गोळीबार करणार्यांनी मंदिराशेजारील हिंदूंच्या घरांवरही गोळीबार केला. प्राथमिक अन्वेषणानुसार आक्रमण करणारे ९ जण होते. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
३. या मंदिराचे व्यवस्थापना बागडी समाजाकडून करण्यात येते. या समाजातील डॉ. सुरेश यांनी म्हटले की, दरोडेखोरांनी डागलेले रॉकेट मंदिरामध्ये फुटलेच नाही. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे स्थानिक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी हिंदूंना संरक्षण द्यावे.
४. यापूर्वी १५ जुलैच्या रात्री कराचीमध्ये १५० वर्षे जुने मारीमाता मंदिर बुलडोझर चालवून मंदिर पाडण्यात आले होते. मारीमाता मंदिराची भूमी ७ कोटी रुपयांना विकण्यात आल्याने मंदिर पाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी या मंदिरातील देवतांच्या मूर्ती फोडण्यात आल्याचीही घटना घडली होती.
५. मारीमाता मंदिराचे व्यवस्थापन तमिळी हिंदु समाजाकडे होते. त्यांनी सांगितले की, हे मंदिर अतिशय जुने होते आणि ते जीर्ण झाल्यामुळे कधीही कोसळू शकते, अशी त्याची स्थिती होती. त्यामुळेच आम्ही बहुतांश मूर्ती तात्पुरत्या स्वरूपात अन्य ठिकाणी हालवल्या होत्या. नवीन मंदिर बांधल्यानंतरच मूर्ती पुन्हा जागेवर ठेवल्या जातील, असे आम्हाला वाटले होते. या मंदिराच्या अंगणात जुना खजिना गाडल्याच्या कथाही प्रसिद्ध आहेत.
सिंधमध्ये ३० हिंदूंना दरोडेखोरांनी ठेवले ओलीस !
पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की, सिंध प्रांतातील काशमोर आणि घोटकी जिल्ह्यांतील कायदा आणि सुव्यवस्थेमुळे आम्ही चिंतित आहोत.
(सौजन्य : Republic Bharat)
येथे महिला, मुले यांच्या समवेत ३० हिंदूंना दरोडेखोरांनी ओलीस ठेवले आहे. सिंधच्या गृह विभागाने तात्काळ या घटनेचे अन्वेषण केले पाहिजे.
संपादकीय भूमिका
|