जादूटोणा करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ३ कथित साधू पोलिसांच्या कह्यात !
एकाचे नाव शहजाद !
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील जवाहर टेकडी भागातील एका उपाहारगृहातून पोलिसांनी ३ साधूंना चौकशीसाठी कह्यात घेतले. या तिघांवर जादूटोणा करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच या तिघांपैकी एकाचे नाव शहजाद असल्याचे त्यांनी सांगितले. बजरंग दलाचे तन्नू शर्मा यांनी सांगितले की, या तिघांनी अंशुल राठोड नामक एका व्यक्तीला थांबवून त्यांच्याकडील पैसे आणि सोन्यांची अंगठी काढून घेतली होती. याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकादेशात काही ठिकाणी भगवे कपडे परिधान करून आणि केस, दाढी वाढवून काही मुसलमान साधू बनवून पैसे उकळतांना पकडले गेले आहेत. धर्मांधांनी आता हा ‘साधू जिहाद’ चालू केला आहे का ?, अशी शंका येते ! |