गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात २ सहस्र ३८७ प्रश्न आणि ८ सरकारी विधेयके
पणजी, १६ जुलै (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या १८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होत असलेल्या अधिवेशनासाठी विधीमंडळ सचिवांकडे आतापर्यंत २ सहस्र ३८७ प्रश्न आलेले आहेत. यामधील ५८९ हे तारांकित प्रश्न आहेत, तर उर्वरित १ सहस्र ७९८ प्रश्न अतारांकित आहेत. तसेच अधिवेशनात मांडण्यासाठी आतापर्यंत ८ सरकारी विधेयके विधीमंडळ सचिवांकडे आलेली आहेत.
अधिवेशनात आणखी काही सरकारी विधेयके, खासगी विधेयके आणि लक्षवेधी ठराव मांडले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गत अधिवेशनात मांडलेल्या अर्थसंकल्पावर या अधिवेशनातही चर्चा होणार आहे. विरोधकांनी अधिवेशनात विविध सूत्रांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.