गोव्यात कह्यात घेतलेले २५ किलो अमली पदार्थ आज नष्ट केले जाणार
देशभरात २ सहस्र ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ सहस्र किलो अमली पदार्थ नष्ट केले जाणार !
पणजी, १६ जुलै (वार्ता.) – गोव्यात विविध ठिकाणी धाड टाकून कह्यात घेतलेले एकूण २५ किलो अमली पदार्थ ‘एन्.सी.बी.’ आणि अमली पदार्थविरोधी कृती दल हे १७ जुलै या दिवशी संयुक्तपणे नष्ट करणार आहेत. अमली पदार्थविरोधी राष्ट्रीय मोहिमेचाच हा एक भाग आहे.
अशाच प्रकारे ‘एन्.सी.बी.’ आणि अमली पदार्थविरोधी कृती दल हे संयुक्तपणे देशभरात विविध ठिकाणी २ सहस्र ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ सहस्र किलो अमली पदार्थ नष्ट करणार आहे.
Over 1.44 Lakh Kg Drugs To Be Destroyed In Virtual Presence Of Shah On Mondayhttps://t.co/2Q66P2Bss3
— Daily Excelsior (@DailyExcelsior1) July 16, 2023
अमली पदार्थ नष्ट करण्याच्या मोहिमेसमवेतच देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर विभागीय परिषद होणार आहे.
अमित शाह सोमवार को ‘ड्रग्स तस्करी एवं राष्ट्रीय सुरक्षा’ पर क्षेत्रीय सम्मेलन की अध्यक्षता करेंगे https://t.co/pfiwZaCjtj
— Janta Se Rishta News | जनता से रिश्ता न्यूज़ (@jantaserishta) July 16, 2023
१७ जुलै या दिवशी नष्ट करण्यात येणार्या अमली पदार्थांची संख्या पकडल्यास १ जून २०२२ पासून आतापर्यंत अमली पदार्थ नष्ट केल्याची संख्या १० लाख किलोवर (किंमत सुमारे १२ सहस्र कोटी रुपये) पोचणार आहे.
|