बँडस्टँड (वांद्रे) येथे व्हिडिओ काढतांना समुद्रात बुडून पत्नीचा मृत्यू !
मुंबई – वांद्रे येथील बँडस्टँड येथे फिरायला गेलेले सोनार दांपत्य समुद्रातील दगडावर बसले होते आणि त्यांची मुले त्यांचा व्हिडिओ काढत होती. मागून समुद्राच्या मोठमोठ्या लाटा येत होत्या. त्या वेळी मुलाने आई-वडिलांना बजावलेही; पण त्यांनी ऐकले नाही. तितक्यात एक मोठी लाट आल्याने दांपत्य समुद्रात पडले. पती मुकेश सोनार याला लोकांनी वाचवले; पण पत्नी ज्योती सोनार (वय ३२ वर्षे) हिला वाचवता आले नाही. भारतीय तटरक्षक दलाला ज्योतीचा मृतदेह सापडला आहे. मुकेश यांनी ‘सामाजिक संकेतस्थळांवर ‘लाईक्स’ (आवडले) मिळवण्यापेक्षा आपल्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे’, असे म्हटले आहे. (पत्नीला गमावल्यावर असे विधान करणे याला ‘उशिरा सुचलेले शहाणपण’च म्हणावे लागेल ! – संपादक)