टोलनाक्यावरील कर्मचार्याला ट्रकचालकाने १२ कि.मी. फरफटत नेले !
पुणे – पुणे-सातारा महामार्गावर एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. त्या वेळी ‘ट्रक सामानाने अती भरलेला आहे का ?’, अशी विचारणा करण्यास गेलेल्या खेड-शिवापूर पथकर नाक्यावरील कर्मचार्याला नशेत असलेल्या ट्रकचालकाने १२ कि.मी.पर्यंत फरफटत नेले. नसरापूर येथील गावकर्यांनी ट्रक अडवून लटकलेल्या कर्मचार्याची सुटका करून जीव वाचवला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे. ट्रक आणि चालक यांना किकवी पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :पथकर नाक्यावरील कर्मचार्याला फरफटत नेणे हे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे उदाहरण ! |