गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपयांचा दर !
राज्यशासनाचा निर्णय !
मुंबई – गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपयांचा दर देण्यात येणार आहे, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकर्यांची आर्थिक हानी होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील दूध दर प्रश्नाविषयी विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि पशूखाद्य उत्पादक प्रतिनिधींसमवेत पशूसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला.