हिंदु तरुणीशी विवाह करण्यासाठी हिंदु धर्म स्वीकारण्याचा कथित प्रयत्न करणार्या विवाहित मुसलमान तरुणाला अटक
मुसलमान पत्नीच्या मारहाण करत असल्याच्या तक्रारीवरून कारवाई
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – हिंदु धर्माचा स्वीकार करून हिंदु तरुणीशी विवाह करण्यासाठी येथील आमीर अली याने जिल्हाधिकार्यांकडे अर्ज केला होता; मात्र त्याच्या मुसलमान पत्नी गुलफशा हिने त्याच्यावर हुंडा मागणे, मारहाण करणे आणि फसवणूक करणे असे आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत आमीरचे आई-वडील, बहिण आणि तिचे पती आदी ७ जणांवर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी आमीर अली याला अटक केली आहे. आमीरच्या पत्नीचा, ‘आमीर याचे या हिंदु तरुणीशी वर्ष २०१४ पासून संबंध आहेत आणि ते मला मार्गातून हटवण्याचा प्रयत्न करत होते’, असा आरोप केला आहे. आमीरची पत्नी गुलफशा हिच्याशी विवाह करण्यापूर्वी तो हिंदु तरुणी समवेत ‘लिव इन रिलेशनशिप’मध्ये रहात होता.
हिन्दू लड़की से शादी करने जा रहा था आमिर अली, बीवी ने ही पहुँचवा दिया जेल: पूरा परिवार करता था मारपीट और गाली-गलौज, 3 बार कराया गर्भपात#Moradabad #LoveJihadhttps://t.co/JCqYWN352n
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 16, 2023
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |