अलवर (राजस्थान) येथील जुनैद याने ‘रोहित’ बनून देहलीतील हिंदु मुलीशी केले लग्न !
अलवर (राजस्थान) – येथील जुनैद या मुसलमान तरुणावर ‘लव्ह जिहाद’च्या अंतर्गत हिंदु तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित हिंदु तरुणी देहलीची रहिवासी आहे. जुनैद विवाहित असून तो अलवरमधील ककराली गावचा रहिवासी आहे. पीडित तरुणीने सांगितले की, जुनैदने ‘रोहित’ असे हिंदु नाव धारण करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिच्याशी लग्न केले. जुनैदने दीड वर्ष तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. लग्नानंतर पीडित तरुणी तिच्या सासरी पोचली तेव्हा तिथे जुनैदचे खरे नाव समोर आले. मुसलमान असण्यासोबतच तो आधीच विवाहित असल्याचेही समोर आले. पीडित तरुणीने अलवरचे महिला पोलीस ठाणे गाठून तक्रार प्रविष्ट केली. जुनैदने तिच्याकडून ८ लाख रुपये उकळल्याचा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे.
India 🇮🇳: Junaid Khan, a Muslim man posing as a Hindu named Rohit Pradhan, befriended & raped a 24-yr-old Hindu woman in Rajasthan’s Alwar.
He married the girl by tricking her via Social Media profile named Rohit Pradhan
The woman is a beautician from Delhi & Junaid Khan is a… pic.twitter.com/j0FfUwXEBK
— Ashwini Shrivastava (@AshwiniSahaya) July 16, 2023
महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी ताराचंद शर्मा यांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या तक्रारीच्या आधारे आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाराजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार अस्तित्वात असल्यामुळे तेथे हिंदु युवतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षाच नको ! |