‘लँड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तात्काळ रहित करा ! – कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना
|
कोल्हापूर – छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार कह्यात घेत आहे, तर दुसरीकडे ‘मुसलमानांची धार्मिक संस्था’ सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा अपवापर करत हडप करत चालली आहे. त्यामुळे ‘वक्फ बोर्डा’चे सर्व पाशवी अधिकार काढून घेऊन त्यावर सरकारचे नियंत्रण आणायला हवे आणि ‘लँड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तात्काळ रहित करावा, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात करण्यात आली. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे १६ जुलैला सकाळी ११ वाजता करण्यात आले.
या प्रसंगी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, उद्धव ठाकरे गट करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मनोगत व्यक्त केले.
‘‘ भूमी हडपणार वक्फ बोर्ड, तक्रार करायची ‘वक्फ’बोर्ड कडेच तपास करणार वक्फच, निवाडा व न्यायही वक्फ बोर्डच देणार.हा धार्मिक पक्षपातच आहे.’’
त्यामुळे ‘लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना @Ramesh_hjs pic.twitter.com/DXGVq4nZMf— Sunil Ghanwat (@SG_HJS) July 16, 2023
(सौजन्य : Jai Maharashtra News)
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, श्री. नितीन चव्हाण, बजरंग दलाचे हुपरी येथील श्री. सचिन माळी, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. संदीप घाटगे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, भीमराव पाटील, आदित्य कराडे, नितीन काकडे, चारुदत्त पोतदार, रमेश पडवळ, संदीप पाटील, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. संजय कुलकर्णी, श्री. राजू तोरस्कर, श्री अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांसह १२ हून अधिक संघटना-पक्ष यांचे १०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
(सौजन्य : ABP MAJHA)
हे ही वाचा –
♦ छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
https://sanatanprabhat.org/marathi/701768.html