(म्हणे) ‘पाकमध्ये कारवाया करणार्या तालिबानी आतंकवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये मिळत असलेला आश्रय सहन करणार नाही !’ – पाकचे संरक्षणमंत्री
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची अफगाणिस्तान सरकारला चेतावणी !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये आतंकवादी कारवाया करणार्या आतंकवाद्यांना शेजारील देश अफगाणिस्तानमध्ये आश्रय दिला जात आहे. पाक आता हे सहन करणार नाही, अशी चेतावणी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली. तत्पूर्वी पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांनीही असाच आरोप केला होता. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही आतंकवादी संघटना पाकच्या सैन्यावर आक्रमण करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
पाकिस्तान के रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ ने दावा किया कि उनके देश में खून-खराबा करने वाले आतंकवादियों को अफगानिस्तान में शरण मिल रही है. उन्होंने कहा कि पाकिस्तान अब इसे सहन नहीं करेगा.#Pakistan #Afghanistan #PakistanTerrorAttack #Taliban https://t.co/Nfx8TD8ktz
— ABP News (@ABPNews) July 15, 2023
१. ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, अफगाणिस्तान शेजारी देशाचे कर्तव्य पार पाडत नाही. तो दोहा कराराचे पालनही करत नाही. ५० ते ६० लाख अफगाण शरणार्थींनी गेल्या ५० वर्षांपासून पाकमध्ये आश्रय घेतला आहे; मात्र या उलट पाकिस्तान्यांचे रक्त वहाणार्या आतंकवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीवर आश्रय मिळत आहे. अशा प्रकारची स्थिती आता चालणार नाही. पाकिस्तान स्वतःची भूमी आणि नागरिक यांच्या रक्षणासाठी सर्व साधनांचा वापर करील.
२. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना त्यांच्या देशात आश्रय दिल्याचा आरोप केला आहे. ही आतंकवादी संघटना संपूर्ण पाकमध्ये शरीयत कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती पाकमध्ये आतंकवादी आक्रमण करत आहे. वर्ष २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यापासून तिच्या कारावायांमध्ये वाढ झाली आहे.
आमच्याकडे टीटीपीचे आतंकवादी असल्याचा पाकने पुरावा द्यावा ! – तालिबानने पाकला सुनावले !
पाकिस्तानच्या आरोपांवर अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारने प्रत्युत्तर दिले आहे. तालिबानचा सरकारचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये टीटीपीचे अस्तित्व नाही. जर पाककडे टीटीपी अफगाणिस्तानमध्ये असल्याचे पुरावे असतील, तर त्याने ते आम्हाला द्यावेत. यानंतर आम्ही त्यावर विचार करून कारवाई करू.
मुजाहिद याने पुढे म्हटले की, पाकिस्तान दोहा कराराचा भाग नाही. यामुळे त्याला या करारावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. हा करार अफगाणिस्तान आणि अमेरिका यांच्यात झाला होता. अफगाणिस्तान पाकिस्तानला एक इस्लामी शेजारी देश समजत असल्यामुळे तो या कराराच्या पलीकडे जाऊन पाकशी संबंध ठेवत आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकच्या विरोधात केला जात नाही.
संपादकीय भूमिकाजे गेली ३३ वर्षे पाकिस्तान भारतामध्ये आतंकवाद्यांच्या माध्यमातून कारवाया करत आहे, तेच जर अफगाणिस्तानमधून पाकच्या विरोधात तालिबानी आतंकवादी कारवाया करत असतील, तर ते पाकच्या कर्माचे फळच म्हणावे लागले ! |