सातारा येथील स्नेहल मांढरे हिला ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कार घोषित !
सातारा, १५ जुलै (वार्ता.) – धनुर्विद्या खेळात उत्तुंग कामगिरी केल्याविषयी सातारा येथील स्नेहल विष्णु मांढरे हिला राज्यशासनाच्या वतीने वर्ष २०१९-२० या कालावधीतील ‘शिवछत्रपती’ हा राज्य क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर; साता-यात जल्लाेष#saamtv #saamdigital #maharashtra #shivchhatrapatiaward #sports #snehalmandhare #archeryhttps://t.co/6nLtHE2uVD
— SaamTV News (@saamTVnews) July 14, 2023
राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना पुरस्कार घोषित केले. या वेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘‘राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन झाले पाहिजे, तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या राज्यातील क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.’’