‘द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सोमनाथ मंदिरावरील गझनीच्या आक्रमणाच्या वेळी झालेल्या युद्धाचे चित्रण

टीझर (लहान विज्ञापन)

मुंबई – ‘द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ’ (सोमनाथाच्या युद्धाची कथा) या हिंदी चित्रपटाचा टीझर (लहान विज्ञापन) प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात महंमद गझनी याने सोमनाथ मंदिरावर केलेल्या आक्रमणाच्या वेळी झालेल्या युद्धाची घटना दर्शवण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या या मंदिराच्या जीर्णाद्धाराविषयी सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट १२ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मनीष मिश्रा हे या चित्रपटाचे निर्माते आणि लेखक असून अनूप थापा हे दिग्दर्शक आहेत. चित्रपटातील कलाकार कोण आहेत ? आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित करण्यात येणार आहे ?, यांविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या चित्रपटामध्ये सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाचीही माहिती देण्यात आली आहेत. सत्ययुगामध्ये चंद्र देवाने ते सोन्यापासून बनवले होते, तर त्रेता युगात रावणाने तांब्यापासून शिवलिंग बनवले होते. द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने ते लाकडापासून बनवले होते.