माधवराव गाडगीळ महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने १८ जुलै ते १४ ऑगस्ट ‘अधिक श्रावण मास संकल्प’ !
मिरज – माधवराव गाडगीळ महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने १८ जुलै ते १४ ऑगस्ट ‘अधिक श्रावण मास संकल्प’चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत मिरज नगरीतील सर्व भाविकांनी १८ जुलैपासून प्रतिदिन ‘ॐ नमः शिवाय’ हा जप त्यांच्या घरी करावा. हा जप किती झाला याची नोंद ठेवावी. १ कोटी जपाचा संकल्प असून अधिक मास पूर्ण झाल्यावर १४ ऑगस्टला लिखित जप जमा करावयाचा आहे. यानंतर ह.भ.प. हृषीकेश बोडस यांच्या भजनाचा कार्यक्रम काशीविश्वेश्वर मंदिर, भानू तालीमसमोर होऊन, या संकल्पाची सांगता होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. किशोर पटवर्धन आणि श्री. माधवराव गाडगीळ यांनी केले आहे.