वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोर (जिल्हा पुणे) येथे त्यांना अभिवादन !
भोर (जिल्हा पुणे), १५ जुलै (वार्ता.) – श्री वीर बाजीप्रभु प्रतिष्ठान कसबे शिंद आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भोर तालुका यांच्या वतीने वीररत्न बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे, वीर शिवा काशीद आणि बांदल सेनेच्या ३६३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पावनखिंड (कोल्हापूर) ते भोर तालुक्यातील कसबे शिंद गाव असे २५० कि.मी. ज्योत आणून हे अभिवादन केले. ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलीदान देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात लढा दिला, त्यांचे आज स्मरण होऊन पुन्हा ते शौर्य जागृत व्हावे, यासाठी कसबे शिंद तालुका भोर येथील सर्व धारकरी यांनी एकत्रित येऊन पुढाकार घेऊन वरील उपक्रमाचे आयोजन केले होते.