केरळमध्ये प्राध्यापकाचा हात तोडणार्या ६ पैकी ३ धर्मांध मुसलमानांनी जन्मठेपेची शिक्षा !
एर्नाकुलम् (केरळ) – येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने वर्ष २०१० मध्ये प्रा. टी.जे. जोसेफ याचा हात तोडल्याच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ३ जिहादी कार्यकर्त्यांना जन्मठेप, तर अन्य ३ जणांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. जन्मठेप झालेल्या सजील, नजीब आणि एम्.के. नजर यांना ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. एम्.के. नौशा, पी.पी. मोइदीनकुनु आणि पी.एम्. अयूब अशी अन्य तिघांची नावे आहेत. न्यायालयाने पीडित जोसेफ यांना ४ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचाही आदेश दिला आहे. कुराणाचा अवमान केल्याच्या रागातून दोषींनी जोसेफ यांच्यावर आक्रमण करून त्यांचा हात कापला होता.
PFI के जिन कट्टरपंथियों ने काटा था केरल में प्रोफेसर का हाथ, उन्हें 13 साल बाद मिली उम्रकैद की सजा: 3 दोषियों को सिर्फ 3 साल की जेल#PFI #Keralahttps://t.co/WFU5kffard
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 14, 2023
संपादकीय भूमिकावर्ष २०१० च्या प्रकरणात १३ वर्षांनंतर शिक्षा होणे हा पीडित व्यक्तीला मिळणारा न्याय नव्हे, अन्यायच होय ! |