जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी परप्रांतीय हिंदु कामगारांवर केला गोळीबार : ३ जण घायाळ
शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथील गगरान गावामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ३ हिंदु कामगार घायाळ झाले. आतंकवाद्यांनी त्यांना लक्ष्य करून हा गोळीबार केला होता. या कामगारांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. अनमोल कुमार, पिंटूकुमार ठाकूर आणि हिरालाल यादव अशी त्यांची नावे आहेत. ते बिहारमधील आहेत. राज्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. ‘आतंकवाद्यांना शिक्षा करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू. तसेच घायाळांना सर्वप्रकारचे साहाय्य करण्यात येणार’, असेही त्यांनी सांगितले.
#BREAKINGNEWS
J&K के शोपियाँ में आतंकी हमला
आतंकियों ने 3 मज़दूरों को गोली मारी
आतंकी हमले में तीनों मज़दूर घायल #SauBaatKiEkBaat @KishoreAjwani @rifatabdullahh pic.twitter.com/UGCDhKs59g— News18 India (@News18India) July 13, 2023
जम्मू-काश्मीरचे भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर म्हणाले की, आतंकवाद्यांनी निःशस्त्र आणि परप्रांतीय कामगारांवरील आक्रमणाचा आम्ही निषेध करतो.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये अद्यापही स्थानिक आणि परप्रांतीय हिंदु सुरक्षित नाहीत, हेच अशा घटनांतून सतत लक्षात येत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |