कराड येथील श्री उत्तरालक्ष्मी मंदिराच्या मिळकतीवर वक्फ बोर्डाचा डोळा !
कराड, १३ जुलै (वार्ता.) – येथील हिंदु धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री उत्तरालक्ष्मी मंदिर परिसरातील जागेवर मुसलमान समाजाची स्मशानभूमी आहे. ती मूळची गायरान पैैकी भूमी असून सातारा जिल्हाधिकारी यांचे हु.नं. एल्.एन्.डी./२४००/१९३१ अन्वये मुसलमान स्मशानभूमीकडे ठेवण्यात आलेली (असाईन) आहे. या मिळकतीच्या सिटी सर्वे उतार्यावर ‘वक्फ बोर्ड आणि प्रतिबंधित सत्ता प्रकार’ अशी नोंद करण्याविषयी काही लोकांनी अर्ज केलेले आहेत. तरी अशा कोणत्याही प्रकारची नोंद सदरच्या मिळकतीवर करण्यात येऊ नये, या मागणीसाठी कराड परिसरातील सकल हिंदु समाजाच्या वतीने कराडचे नायब तहसीलदार आनंद देवकर, उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे, भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कराड शहर आणि तालुक्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.