१७-१८ जुलैला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
जगबुडी नदीची पातळी वाढली
रत्नागिरी – १७ जुलै या दिवशी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना आणि १८ जुलैला रत्नागिरी, रायगड आणि पुणे येथे वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत जोरदार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Kolhapur News : कोल्हापूरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, खेडच्या जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी#saamtv #saamdigital #kolhapur #rain #ratnagiri #jagbudiriver #rajaramdamhttps://t.co/vK9xuqkj1d
— SaamTV News (@saamTVnews) July 7, 2023
गुरुवार १३ जुलैपासून मुंबईसह किनारपट्टीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस चालू झाला आहे. या आठवड्यात पावसाचा हा जोर असाच कायम राहणार आहे. अद्याप जिल्ह्यांत दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक जलसाठे पुरेसे भरलेले नाहीत. खेड येथील जगबुडी नदीची पातळी वाढली असून तिने आता धोक्याची पातळीही ओलांडली असल्याचे वृत्त आहे.