बलुचिस्तानमध्ये पाक सैन्यावरील २ आक्रमणांत १२ सैनिक ठार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) –बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या सशस्त्र संघटना आणि पाक सैन्य यांच्यात झालेल्या २ वेगवेगळ्या चकमकींमध्ये पाकचे १२ सैनिक ठार झाले, तर ५ सैनिक घायाळ झाले. तसेच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या सशस्त्र संघटनेचे ७ जण ठार झाले. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कुठल्याही संघटनेने स्वीकारलेले नाही.
सई भागात पाक सैन्याकडून शोधमोहीम राबवण्यात येत असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. यात ३ पाकचे सैनिक ठार झाले. या वेळी पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबारात बलुची संघटनेचे २ जण ठार झाले.
Pakistan: बलूचिस्तान में दो अलग-अलग हमलों में 12 पाकिस्तानी सैनिकों की मौत, पांच घायल#Balochistan #PakistanArmy #Attack #Terrorist #ISPRhttps://t.co/f9Nltjlze3
— Amar Ujala (@AmarUjalaNews) July 13, 2023
झोब गॅरीसन येथे सैन्याच्या तळावर आक्रमण करण्यात आले होते. या वेळी झालेल्या चकमकीत ९ सैनिक ठार झाले, तर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या सशस्त्र संघटनेचे ५ जण ठार झाले.