अहिल्यानगर येथे मदरशात हिंदु तरुणीवर अत्याचार, बळजोरीने धर्मांतर !
मौलवीसह ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)
अहिल्यानगर – कोपरगाव तालुक्यातील खडकी येथील मदरशामध्ये एका २० वर्षीय हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर चौघांनी अत्याचार केले. या अत्याचाराचा ‘व्हिडिओ’ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यात आले, तसेच तिच्या घरच्यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. इंदूर येथील एका मौलवीने पीडितेला बळजोरीने नमाजपठण करायला लावले. तिचे बळजोरीने धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणी मध्यप्रदेशातील सायम कुरेशी आणि मौलवी, तसेच कोपरगाव येथील इमरान अयुब शेख, कलिम अशा ४ जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी या मुलीची सुटका केली. ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून ओळख झालेल्या इंदूरच्या सायम कुरेशी याने मुलीला जाळ्यात ओढले. ‘हिंदु धर्मापेक्षा इस्लाम धर्म कसा चांगला आहे ?’, हे तिच्या मनावर बिंबवण्यात आले. त्यानंतर कुरेशी याने तिचे धर्मांतर करून तिच्यासोबत इंदूरमध्ये विवाहही केला. (अजून किती तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर लव्ह जिहादविरोधी कायदा होणार आहे ? नगर येथील लव्ह जिहादच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन कठोर पावले कधी उचलणार ? – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांना अपकीर्त करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात ! मशिदी आणि मदरसे यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे ! |