ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान समर्थकांकडून भारतीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण !
सिडनी (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान समर्थक सातत्याने भारतियांना लक्ष्य करत आहेत. येथील मेरीलँड्स या उपनगरात खलिस्तान समर्थकांनी एका भारतीय विद्यार्थ्याला लोखंडी सळीद्वारे अमानुष मारहाण केली.
ऑस्ट्रेलिया में फिर से खालिस्तानियों का दुस्साहस, सिडनी में भारतीय छात्र को लोहे की रॉड से पीटा #australia #sydney #khalistan #ऑस्ट्रेलिया #खालिस्तान #सिडनी https://t.co/IT470LVKDY
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) July 14, 2023
भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासह वाहनचालक म्हणूनही काम करतो. १४ जुलै या दिवशी तो पहाटे साडेपाच वाजता कामावर असतांना ४-५ खलिस्तान समर्थकांनी त्याच्यावर आक्रमण केले. हा विद्यार्थी चारचाकी वाहनात बसलेला असतांना लोखंडी सळीद्वारे त्याच्या गालावर प्रहार केला. नंतर विद्यार्थ्याला गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. या विद्यार्थ्याने सांगितले की, २ जण मारहाणीचे चित्रीकरण करत होते, तर उर्वरित जण मारहाण करत होते. या मारहाणीत घायाळ झाल्याने या विद्यार्थ्याला पोलिसांनी रुग्णालयात भरती केले आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकापंतप्रधान मोदी यांनी नुकत्यात केलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्याच्या वेळी तेथील पंतप्रधानांनी भारतियांचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले होते, ते किती तकलादू होते, हे या घटनेवरून लक्षात येतो ! आता भारत ऑस्ट्रेलियाला जाब विचारणार का ? |