‘चंद्रयान ३’ मोहीम भारतीय अवकाश संशोधनात ऐतिहासिक ठरेल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई – ‘चंद्रयान-३’ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटी यांचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातही भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चंद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे. ही मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
#चंद्रयान_३ मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून चंद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.#चंद्रयान ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द… pic.twitter.com/fMKGUbZ6hS
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 14, 2023
या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘चंद्रयान-३’ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
#Chandrayaan3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी #ISRO च्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ही मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल.या क्षेत्रातही #भारत अग्रेसर असून हे देशाच्या जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे -मुख्यमंत्री pic.twitter.com/LXkwZhzchg
— AIR News Pune (@airnews_pune) July 14, 2023
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘‘या मोहिमेमुळे भविष्यात अनेक वैज्ञानिकांना आणि संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल. या मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार यांनी वैज्ञानिकांना पाठबळ अन् प्रोत्साहन दिले आहे. तरुण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतियांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल.’’