सर्वोच्च न्यायालयाची विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस !
आमदारांच्या पात्रतेच्या निर्णयाला विलंब होत असल्याचे प्रकरण !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थन करणार्या १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना दिले होते; मात्र त्याला दीड मास होऊनही अद्याप निर्णय झालेला नाही. या विलंबाच्या विरोधातही ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने १४ जुलै या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस पाठवली असून येत्या २ आठवड्यांत यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत, अशी मागणी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाला केली होती.#SupremeCourt #MaharashtraPoliticalCrisis https://t.co/Rbw9wF69R2
— Lokmat (@lokmat) July 14, 2023
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ‘सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसेचा अभ्यास करून त्यावर योग्य ते उत्तर दिले जाईल’, असे सांगितले.