चीन ब्रिटनच्या सुरक्षेसाठी मोठा धोका !
ब्रिटनच्या संसदीय समितीचा अहवाल !
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेला चीनपासून सर्वांत मोठा धोका आहे, असे ब्रिटनच्या संसदीय समितीने देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात बनवलेल्या एका अहवालात नमूद केले. चीनने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही सुरूंग लावल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार चीन आतापर्यंत ब्रिटनला आक्रमकरित्या लक्ष्य करण्यात यशस्वी ठरला आहे; कारण चीनपासून रक्षण करण्यची ब्रिटनकडे कोणतीही योजना नाही.
ब्रिटेन की संसदीय समिति की रिपोर्ट: ‘देश की सुरक्षा के लिए चीन खतरा, इससे निपटने के लिए सरकार के कदम नाकाफी’#UK #UKParliamentaryPanel #ChinaThreat https://t.co/560kFuS9TF
— Amar Ujala (@AmarUjalaNews) July 14, 2023
१. अहवालात पुढे म्हटले आहे की, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये चीनचा सहभाग, त्याचा प्रभाव आणि त्याची लुडबूड शोधणे कठीण आहे. सरकारने यापूर्वी या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत. ब्रिटनमधील गुप्तचर यंत्रणा चीनच्या गुप्त कारवायांकडे लक्ष ठेवत असली, तरी चीनची पावले ओळखण्यात ती अपयशी ठरत आहे. आतापर्यंत चीनने ब्रिटनमध्ये केलेल्या गुंतवणुकीची चौकशी झालेली नाही. इतकेच नाही, तर ब्रिटन सरकारने चीनसमवेत केलेल्या वेगवेगळ्या करारांचे पुनरावलोकनही केलेले नाही. काही संस्था चीनच्या कारवायांकडे दुर्लक्ष करत आहेत. चीनकडून पैसे घेऊन ते खुश आहेत. आपण (ब्रिटन) अशा मार्गावर आहोत, जेथे चीन आपल्या योजनांची माहिती चोरू शकतो आणि स्वतःचे मानक (स्टँडर्ड) सिद्ध करू शकतो अन् स्वतःची उत्पादने चालू करू शकतो. त्याद्वारे तो ब्रिटनवर राजकीय आणि आर्थिक दबाव निर्माण करू शकतो.
२. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यापूर्वी म्हटले होते की, त्यांचे सरकार चिनी तंत्रज्ञानावर असलेले अवलंबत्व अल्प करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलत आहे.
संपादकीय भूमिकाब्रिटनच्या सुरक्षेला धोका बनलेला चीन शेजारी असलेल्या भारतासाठी किती धोकादायक असणार याची कल्पना करता येत नाही ! चीनला रोखण्यासाठी सरकारच नव्हे, तर भारतियांनीही सहभागी झाले पाहिजे ! |