केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यामागील सूत्रधार हा लष्कर-ए-तोयबाचा जिहादी आतंकवादी !
नवी देहली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकीचे दोन भ्रमणभाष आले होते. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत झालेल्या या प्रकारामागील सूत्रधाराचे नाव अफसर पाशा असून तो लष्कर-ए-तोएबा या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी असल्याचे समोर आले आहे. तो सध्या कर्नाटकातील बेळगावच्या कारागृहात आहे. त्याच्या सांगण्यावरून त्याचा सहकारी जयेश कंथा उपाख्य जयेश पुजारी याने १४ जानेवारी आणि २१ मार्च या दिवशी गडकरी यांच्या कार्यालयात भ्रमणभाष करून अनुक्रमे १०० कोटी अन् १० कोटी रुपये खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
नितीन गडकरी खंडणी आणि धमकी प्रकरणामागील सूत्रधाराची ओळख पटली आहे. https://t.co/vmO6I8OVeg
— Saamana (@SaamanaOnline) July 14, 2023
१. अफसर पाशा हा बंदी घातलेल्या जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा माजी राष्ट्रीव सचिव असून बाँब बनवण्यात तो तज्ञ आहे. त्याच्यावर ढाका येथे वर्ष २००३ आणि बेंगळुरू येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याचा आरोप आहे.
२. जयेश पुजारी सध्या नागपूर कारागृहात असून त्याच्याकडून भ्रमणभाष आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. अफसर पाशा याच्या कोठडीचीही तपासणी केली जाणार आहे.
३. महाराष्ट्र पोलीस अफसर पाशाला कह्यात घेण्यासाठी कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिकाभारतातील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता ! |