‘नियतकालिक ‘सनातन प्रभात’चे नवीन वाचक बनवतांना वाचक असलेल्यांचे नूतनीकरण करण्याला प्राधान्य द्या !
साधकांसाठी सूचना !
प्रसारातील साधक ‘सनातन प्रभात’ची वाचकवृद्धी होण्यासाठी समाजातील व्यक्तींच्या घरोघरी जाऊन नियतकालिकांचे महत्त्व सांगतात आणि वाचक बनवण्यासाठी प्रयत्न करतात. ‘ग्रंथप्रदर्शने, हिंदु राष्ट्र-जागृती सभा इत्यादींच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या जिज्ञासूंना भेटणे, वाचकांकडून त्यांचे परिचित अन् नातेवाईक यांची सूची घेऊन त्यांना संपर्क करणे, वाचकांना भेटून त्यांच्या अंकाचे नूतनीकरण करणे’ इत्यादी प्रयत्न साधक करत आहेत.
काही जिल्ह्यांतील साधक ‘पूर्वीपासून वर्गणीदार असलेल्या वाचकांचे नूतनीकरण करण्याऐवजी नवीन वाचक बनवण्यावर भर देत आहेत’, असे लक्षात आले आहे. ‘अधिकाधिक जिज्ञासूंना वाचक बनवणे’, हे आपले ध्येयच आहे; परंतु ‘नूतनीकरण न झालेल्या वाचकांच्या अंकाचे नूतनीकरण करणे’, हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे साधकांनी नूतनीकरणाच्या सेवेला प्राधान्य द्यावे आणि त्यानंतर वाचकवृद्धीसाठी प्रयत्न करावेत. (४.७.२०२३)