हिंदु मुलाचे धर्मांतर केल्याचा आईचा आरोप !
अकोला येथील प्रकार !
|
अकोला – येथे हिंदु मुलाचे धर्मांतर केल्याचा आरोप करत त्याच्या आईने याविरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. येथील शुभमचे धर्मांतर करून त्याचे नाव महंमद अली असे पालटण्यात आले आहे. भाग्यनगर येथे अधिक पैशांच्या नोकरीचे आमीष दाखवून धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप आईने केला आहे. आईच्या तक्रारीनंतर ४ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
प्रत्यक्षात मुलाला भाग्यनगर येथे नोकरीसाठी न नेता बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री परिसरात एका मदरशात ठेवण्यात आले. याला विरोध केल्यावर त्याच्या आईला आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. शुभम सध्या आई-वडिलांसमवेत रहात आहे; पण ‘मुसलमान धर्म स्वखुशीने स्वीकारला आहे’, असे त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाधर्मांतरबंदी कायदा लागू झाल्यास असे प्रकार आपोआप थांबतील, हे लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी कृतीशील व्हावे ! कोणत्याही आमिषाला भुलून धर्मांतर करणार्या हिंदूंना तसे करण्यापासून रोखण्यासाठी धर्मशिक्षण देणे अपरिहार्य ! |