स्टुडिओमध्ये गेलेल्या हिंदु मुलीचे कपडे उतरवून शरिराला स्पर्श करणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – शाळेच्या ओळखपत्रासाठी लागणारे छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीचे कपडे उतरवून तिच्या शरिराला स्पर्श करणारा छायाचित्रकार लायकअली अल्लीसाहेब नदाफ याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले आहे. अल्पवयीन विद्यार्थिनी छायाचित्र काढण्यासाठी स्टुडिओमध्ये गेली असता छायाचित्रकार नदाफ तेथे एकटाच होता. विद्यार्थिनीने विरोध करूनही नदाफने तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्या शरीराला स्पर्श केला. हा प्रकार ‘घरात कुणालाही सांगू नकोस, अन्यथा तुला सोडणार नाही’, अशी धमकीही नदाफने दिली होती.
घरी आल्यानंतर मुलीने या प्रकाराची तिच्या आईला माहिती दिली. त्यावर आईने स्टुडिओमध्ये जाऊन नदाफला जाब विचारले असता तो विनवणी करू लागला. ‘माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा, यापुढे असे करणार नाही’, असे त्याने पीडित मुलीच्या आईला सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिका :
|