हिंदुत्वनिष्ठ हरि पाटणकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश !
सांगली – येथील हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. हरि पाटणकर यांनी देव, देश, धर्म यांच्यावर श्रद्धा ठेवून सातत्याने सकारात्मक काम करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश केला आहे. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. तानाजीराव सावंत यांनी पुष्पगुच्छ आणि मनसेची कापडी पट्टी देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी श्री. कुमार सावंत, श्री. अमित पाटील यांसह अन्य मनसैनिक उपस्थित होते. प्रवेश केल्यावर श्री. हरि पाटणकर म्हणाले, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ, मराठी माणसांच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, तसेच अनेक आंदोलने करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असल्याने मी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.’’