हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने ‘धार्मिक शिक्षण आणि अध्यात्मिक साधना’ या कार्यक्रमाचे आयोजन !
मंगळुरू (कर्नाटक) – हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने राज्यातील हवेरी जिल्ह्यात असलेल्या कोडियाला होस्पेट या गावी तपोक्षेत्र पुण्यकोटी मठात ‘धार्मिक शिक्षण आणि आध्यात्मिक साधना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व हिंदु धर्मप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदु राष्ट्र सेनेचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. संदीप के.एन्. (गुरुजी) यांनी यासंदर्भात म्हटले, ‘आपल्या राष्ट्राचा इतिहास पाहिला, तर आपण आपल्या हितशत्रूंमुळेच युद्ध हरलो आहोत. अगदी अलीकडे ही आपल्यातीलच हिंदुविरोधी लोकांमुळे आणि हिंदूंना आध्यात्मिक शिक्षण न मिळाल्याने आपल्या धर्माची हानी होत आहे. ‘यतो धर्म: तथो जय: ।’ म्हणजे जिथे धर्म आहे, तिथे विजय असतो; म्हणून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी १५ जुलै या दिवशी तपोक्षेत्र पुण्यकोटी मठात ‘धर्मशिक्षण आणि आध्यात्मिक साधना कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.’