कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा दोषी !
१८ जुलै या दिवशी न्यायालय सुनावणार शिक्षा !
नवी देहली – छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपात झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी देहली विशेष न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे.
दणका: कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्र दर्डा दोषी, 18 जुलै रोजी सुनावणार शिक्षा#VijayDarda #DevendraDarda #CoalMineAllocationScamCase
https://t.co/WXRqLW38NX— Divya Marathi (@MarathiDivya) July 13, 2023
न्यायालयाकडून त्यांना १८ जुलै या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष न्यायालयाने त्यांना कलम १२० ब, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे. ‘या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत’, असे विजय दर्डा यांनी सांगितले आहे.