थायलंडमध्ये होणार्‍या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी श्री हनुमंत असणार अधिकृत शुभंकर (मस्कॉट) !

बँकाक (थायलंड) – येथे होणार्‍या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी श्री हनुमंताला अधिकृत शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आशियाई अ‍ॅथलिटिक्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, भगवान हनुमानाने श्रीरामाची सेवेमध्ये गती, शक्ती, साहस आणि बुद्धी यांद्वारे असाधारण क्षमतांचे दर्शन घडवले होते. श्री हनुमंताची सर्वांत मोठी क्षमता त्यांची दृढ निष्ठ आणि भक्ती आहे. यामुळेच आम्ही श्री हनुमंताला शुभंकर (मस्कॉट) बनवण्याचा निर्णय घेतला. आशियाई अ‍ॅथलिटिक्स स्पर्धेचा लोगो या स्पर्धेमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंची कला, संघ भावना, श्रम आणि खेळाप्रती समर्पण दाखवतो.