‘ओह माय गॉड २’ चित्रपटावर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून आक्षेप !
|
मुंबई – चित्रपटातील काही संवाद आणि दृश्ये यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकत असल्याचे सांगत केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘ओह माय गॉड २’ या अभिनेते अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटावर आक्षेप घेतला. मंडळाने हा चित्रपट पुनरावलोकन समितीकडे पाठवला आहे.
OMG 2: अक्षय कुमार की ‘ओएमजी 2’ पर रोक की खबर, रिलीज करने का सर्टिफिकेट देने से सेंसर बोर्ड का इनकार!#OMG2 #OhMyGod2 #AkshayKumar #PankajTripathi #YamiGautam #OMG2CensorBoardhttps://t.co/LawJ1hSvix
— Amar Ujala (@AmarUjalaNews) July 12, 2023
या चित्रपटाचे लहान विज्ञापन (टीझर) २ दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुनरावलोकन समितीने चित्रपटाला मान्यता न दिल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही. ‘ओह माय गॉड २’ च्या टिझरमध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या वेशात दिसत आहे.