खाणावळीत स्वयंपाक करतांना पतीने पत्नीला न विचारता २ टोमॅटोंचा वापर केल्याने पत्नी मुलीसह घर सोडून गेली !
टोमॅटो महाग झाल्याचा असाही परिणाम !
शाहडोल (मध्यप्रदेश) – सध्या देशात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोचा दर प्रतिकिलो १३० रुपयांच्या पुढे गेला आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये चोरट्यांनी शेतात पिकलेले टोमॅटो चोरून नेले होते. आता टोमॅटोवरून येथील एका दांपत्यामध्ये वाद होऊन पत्नी मुलीसह घर सोडून गेल्याची घटना घडली आहे.
Madhya Pradesh: Wife Leaves Husband For Using Tomatoes While Cooking Food.https://t.co/CakM8P4hIV pic.twitter.com/IAe5VW6aNX
— TIMES NOW (@TimesNow) July 13, 2023
येथे संजीव बर्मन यांचा खाणावळीचा व्यवसाय आहे. जेवण बनवतांना संजीव यांनी पत्नीला न विचारता २ टोमॅटोंचा वापर केला. यामुळे पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यामुळे रागावलेली पत्नी मुलीसह घर सोडून निघून गेली. संजीवने पत्नी आणि मुलगी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्या कुठेही सापडल्या नाहीत. यानंतर संजीव यांनी त्या दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली. ३ दिवस उलटल्यानंतरही अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.