हिंदु अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि बलात्कार केल्याच्या प्रकरणी सैफ अलीला अटक
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – सैफ अली नावाच्या एका विवाहित मुसलमानाला एका १६ वर्षीय हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेशातील फतेहपूर पोलिसांनी नुकतीच अटक केली.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, ७ जुलै या दिवशी एका हिंदु महिलेने तिची १६ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारीत सैफ अली याच्यावर मुलीला फूस लावल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. ११ जुलैला मुलीचा शोध लागला. पीडित मुलीला तिच्या कुटुंबियांच्या कह्यात देण्यात आले आहे.
‘अब तुम मुस्लिम बन गई’: हिंदू नाबालिग को ईंट भट्ठे में ले गया सैफ अली, मौलवी को बुलाकर कबूल करवाया इस्लाम; फिर वहीं किया रेप#UttarPradesh https://t.co/cCuBUXfk0G
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 12, 2023
पीडित मुलीने सांगितले की, सैफने तिचे अपहरण केल्यानंतर तिला कैद केले. तिच्यावर बलात्कार केला आणि मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) बोलावून तिचे धर्मांतर केले. इस्लाम स्वीकारल्यानंतर सैफने पीडितेचे नाव रुबीना ठेवले. सैफच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचेही अल्पवयीन मुलीने सांगितले. पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सैफच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.