रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर संभाजीनगर येथील सौ. ज्योती चव्हाण यांना आलेल्या अनुभूती !
५.८.२०२२ ते ७.८.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मी एका सेवेसाठी गेले होते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘मला सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे विराट रूपात दर्शन झाले.
२. ‘रामनाथी आश्रमातील सर्व साधक वायुवेगाने चालत आहेत’, असे मला जाणवले.
३. एका सत्संगात मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवत होते.
४. ‘रामनाथी आश्रमात मी आपोआप चालत आहे’, असे मला जाणवले.
५. ‘रामनाथी आश्रमातील उद़्वाहनामध्ये (लिफ्टमध्ये) सुगंध येत आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. ज्योती चव्हाण, संभाजीनगर (८.८.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |