गोतस्कराला हरियाणा उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याचे दुर्मिळ प्रकरण !
१. हरियाणामध्ये गोतस्करांना उच्च न्यायालयाकडून जामीन असंमत
‘बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बादशाहपूर (हरियाणा) येथे रात्री २ वाजून २० मिनिटांनी गोमाता, गोवत्स आणि गोवंश यांनी दाटीवाटीने भरलेले वाहन भरधाव वेगाने जात असल्याचे दिसले. त्यांनी गोतस्करांना वाहन थांबवण्यास सांगितले. तेव्हा गोतस्करांनी त्यांच्यावरच दगडफेक केली, तसेच वाहन थेट त्यांच्या अंगावर घातले. त्यामुळे वाहन पलटी झाले. त्यानंतर ५ पैकी २ धर्मांध गोतस्कर पळून गेले आणि उरलेल्या ३ जणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले अन् त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले. या प्रकरणी सत्र न्यायालयाने गोतस्कर शरीफ याचा जामीन अर्ज असंमत केला. त्यामुळे तो जामीन मिळवण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात गेला. तेथे त्याने सांगितले की, तो वर्ष २०२२ पासून कारागृहात असून अन्वेषण संपले आहे. त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचा एकही गुन्हा नसल्याचेही त्याने खोटे सांगितले; पण तो गोहत्या करण्यासाठी गोतस्करी करत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्याला उच्च न्यायालयानेही जामीन असंमत केला.
२. गोतस्करी थांबवण्यासाठी केंद्रस्तरावर कठोर कायदे करणे आवश्यक !
गोतस्करी हा विषय अतिशय गंभीर आहे. त्याला थांबवण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा नाही. भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदे करण्यात आले आहेत. ‘प्राणी क्लेश प्रतिबंध’सारखे (‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएलिटी टू एनिमल्स’सारखे) कायदेही आहेत; मात्र त्यांची परिणामकारक कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे कायदे आणखी कठोर केले पाहिजेत. त्यात शिक्षेचे मोठे प्रावधान करून जामीन देण्यावर मर्यादा आणल्या पाहिजेत. तसेच एकाहून अधिक गुन्ह्यांत सहभाग असल्यास आरोपीला जामीन फेटाळण्याचे प्रावधान असले पाहिजे. यात गोमाता ही हिंदूंच्या श्रद्धास्थानी असल्याने धर्मांध तिचा जाणीवपूर्वक अवमान करतात. त्यांचा हिंदूंना डिवचून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा उद्देश असतो. त्यामुळे यात धार्मिक भावना दुखावून तेढ निर्माण करण्याचेही कलम लावले पाहिजे. एकेका धर्मांधावर अनेक गुन्हे नोंदवलेले असतात. त्यांना सहजपणे जामीन मिळत असल्याने ते सोकावतात आणि ते परत परत गोतस्करी करत असतात. धर्मांध तस्करांना जामीन नाकारला गेल्याचे निकालपत्र दुर्मिळ असते. त्यामुळे कठोर कायदे करून धर्मांध गोतस्करांवर अंकुश घातला पाहिजे, तरच त्यांच्यावर थोडा तरी वचक बसेल. या सर्व गोष्टी हिंदु राष्ट्र अनिवार्य करतात.’
श्रीकृष्णार्पणमस्तु !
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (७.६.२०२३)