सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन दुचाकी फेरीचे आयोजन !
नवी मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – सागरी सीमा मंच, नवी मुंबई; सकल हिंदु समाज, नवी मुंबई; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान; अ.भा.वि.प.; राष्ट्रीय सेवा संघ आणि इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन दुचाकी फेरीचे १६ जुलै या दिवशी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सागरी सीमा मंचचे नवी मुंबई संयोजक रामनाथ म्हात्रे यांनी दिली. सकाळी ११ वाजता दिवाळे बंदर ते सारसोळेगाव गणेश मंदिर अशी ही फेरी काढण्यात येणार आहे. या मध्ये ५०० दुचाकी सहभागी होतील.
या फेरीचे उद़्घाटन कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते दिवाळे बंदर येथे होणार आहे. या फेरीत अनेक सामाजिक संस्था आणि कोस्टल गार्ड सहभागी होणार आहेत.