सत्‍संगाने तुम्‍ही हवे तितके महान बनू शकता !

‘तुमच्‍या अंतरी ईश्‍वराची असीम शक्‍ती दडलेली आहे. वटवृक्षाचे बीज छोटेसे दिसते, हवेची झुळूकही त्‍याला इकडून तिकडे उडवून लावते; परंतु त्‍याच बिजाला संधी मिळाली, तर ते वृक्ष बनते आणि शेकडो वाटसरूंना आराम देण्‍याची त्‍याची योग्‍यता प्रगट होते. शेकडो पक्ष्यांना घरटे बनवण्‍याची संधीसुद्धा ते देते. असेच जीवात्‍म्‍यात बीजरूपाने ईश्‍वराच्‍या सर्व शक्‍ती दडलेल्‍या आहेत, जर त्‍याला सहयोग (ब्रह्मवेत्ता महापुरुषांचा सत्‍संग- सान्‍निध्‍य) वगैरे मिळाला, तर तो हवे तितके उन्‍नत होऊ शकतो, हवे तितके महान बनू शकतो.’

(साभार : ‘ऋषिप्रसाद’, वर्ष २०२२, अंक ३५०)