मुंबईहून बँकॉकला अवैधरित्या परदेशी चलन नेणार्या थायलंडमधील ४ महिलांना अटक !
मुंबई – अवैधरित्या मुंबईहून बँकॉकला परदेशी चलन घेऊन जाणाच्या प्रयत्नात असलेल्या ४ परदेशी महिलांना सीमाशुल्क विभागाने मुंबईतील विमानतळावरून अटक केली आहे. या सर्व महिला थायलंडमधील असून त्यांच्याकडून २.२८ कोटी रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले. या चौघींवर सीमा शुल्क कायदा आणि परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फापाफुस चारोन्निथी (वय ४० वर्षे), नपत चारोन्निथी (वय २५ वर्षे), कोचाफुस चारोन्निथी (वय २७ वर्षे) आणि जिंतारा सैया (वय ३४ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत.
संपादकीय भूमिकासातत्याने घडणार्या अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने ठोस उपाय योजावेत ! |