बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा !

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकांचा निकाल लागला असून यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजप दुसर्‍या स्थानावर आहे; मात्र या दोघांना मिळालेल्या जागांमध्ये मोठे अंतर आहे. साम्यवादी आणि काँग्रेस आघाडी तिसर्‍या क्रमांकावर आहे. तृणमूल काँग्रेसला २९ सहस्र ६६५ ग्रामपंचायतीच्या जागांवर विजय मिळवला आहे. भाजप ८ सहस्र २१, माकप २ सहस्र ४७२ आणि काँग्रेस २ सहस्र ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.

ग्रामपंचायतीच्या ७३ सहस्र ८८७ जागांपैकी ६४ सहस्र ८७४ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. उरलेल्या ९ सहस्र १२ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. या बिनविरोध निवडणुकीत सर्वाधिक, म्हणजे ८ सहस्र ८७४ जागांवर तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. तसेच जिल्हा परिषदेतच्या ९२८ जागांपैकी ७७ जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजपा १० जागांवर आघाडीवर आहे, तर माकप ५ जागांवर विजयी झाली असून काही जागांचा निकाल येणे शेष आहे.