नाम हा खरा गुरु कसा ?
नाम हाच जिवाचा खरा गुरु असून नामाची तळमळ जिवाला चैतन्य प्रदान करून त्याला शिक्षित करते, म्हणजे शिष्यत्वाला नेते, तर सेवा हा शिष्यभाव आहे. सेवाभावातून अहं न्यून झाल्याने शिष्यपणाची जाणीव होते. नाम जिवाला शिष्यत्व प्रदान करते, म्हणून ते निर्गुणवाचक आहे, तर सेवा ही सगुण धारणेची आठवण करून देते, म्हणून ती सगुणवाचक आहे.
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
गुरूंकडे काय मागावे ?
गुरु : काय पाहिजे ?
शिष्य : माझी आठवण आपल्या (आपली आठवण माझ्या) हृदयात अखंड असावी.
तन, मन, धन आणि प्राण गुरूंना अर्पण केल्यावर त्यांच्याकडे मागायचे असे काही उरतच नाही.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)