गुरुपादुका !

गुरूंच्‍या चरणांच्‍या ठिकाणी चार पुरुषार्थ म्‍हणजे ४ मुक्‍ती असतात; परंतु ज्‍या ठिकाणी शिव-शक्‍तीचे ऐक्‍य किंवा सामरस्‍य होते, त्‍यालाच श्रेष्‍ठ गुरुपादुका म्‍हणतात.

स्‍वप्रकाशशिवमूर्तिरेकिका तद्विमर्शतनुरेकिका तयोः ।
सामरस्‍यवपुरिष्‍यते परा पादुका परशिवात्‍मनो गुरोः ॥

– नित्‍यषोडशिकार्णव, विश्राम ८, श्‍लोक ७ वरील सेतुबंधटीका

अर्थ : आत्‍म्‍याचा प्रकाश हा शिवाची मूर्ती आहे. त्‍याच्‍यापासून निघालेली शक्‍ती हे त्‍याचे शरीर आहे. शिवरूप अशा गुरूंच्‍या पादुकांमध्‍ये या दोघांचे सामरस्‍य म्‍हणजे ऐक्‍य सापडते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘गुरूंचे वागणे’)