गुरु-शिष्य नात्याचे अनन्यसाधारण महत्त्व !
गुरु-शिष्य यांतील सर्वोच्च नाते शब्दातीत ज्ञानापुरते मर्यादित असते. गुरु शिष्याला चित्ताच्या स्तराला नेऊन त्याच्यावर ज्ञानरूपी गुह्यतेचा चैतन्याच्या भाषेत संस्कार करून त्याला मायारूपी भवसागर तरून जाण्याचे प्रशिक्षण देतो. गुरु ज्ञानाद्वारे जिवाचा अहं न्यून करतो. गुरूंचे कार्य संपत येते, तेव्हा गुरु-शिष्य नाते संपुष्टात येते; कारण शिष्याला गुरुपण आलेले असते. गुरु ‘आता उरलो उपकारापुरता’ या स्तरावर कार्य करत असतात. शिष्याला गुरुपण आल्यावर त्याचे ज्ञानासहित कार्य चालू होते, तर गुरूंचे ज्ञानोत्तर कार्य चालू होते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
गुरु आणि शिष्य यांचे साधनेला आवश्यक विचार !
देहस्वरूप कृती ही शिष्यत्वाच्या जाणिवेशी, तर कर्मस्वरूप विचार हा गुरुत्वाच्या जाणिवेशी निगडित असेल, तर जिवाची उन्नती शीघ्र होते. शिष्यत्वाची जाणीव म्हणजे ‘गुरुच सर्व करत आहेत, मी निमित्तमात्र आहे’, तर गुरुत्वाची जाणीव म्हणजे ‘सर्वकाही ईश्वर करत असून माझा जन्म शिष्य निर्मितीसाठी आहे.’
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी)