संत तुकोबारायांच्या पालखीचे चौफुला, वाखारी येथे स्वागत !
केडगाव (जिल्हा पुणे) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या मार्गावरील दौंड तालुक्यात चौफुला वाखारी येथे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकर्यांना चौफुला-केडगाव ग्रामस्थांनी साबुदाणा वडा आणि मसाला दुधाचे वाटप केले. वाखारी येथे सार्थक हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते पालखीला अभिषेक घालण्यात आला. शंकर ढमे यांनी आरती केल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला.