देहलीत चुकीच्या दिशेने जाणार्या शाळेच्या बसच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू
नवी देहली – येथील मेरठ महामार्गावर एक मार्गी रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या शाळेच्या बसने एका चारचाकी गाडीला धडक दिल्याने या गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये २ लहान मुले, २ महिला आणि २ पुरुष यांचा समावेश आहे. या बसमध्ये विद्यार्थी नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकाला तत्काळ अटक केली आहे.
Six killed, two injured in school bus-SUV collision on Delhi-Meerut Expressway #BusAccident
Catch the day’s latest news and updates 🔴 https://t.co/7tkskNGrMJ pic.twitter.com/zyElXxNkx1— Economic Times (@EconomicTimes) July 11, 2023